'नंददीप'मध्ये मनीषचा रवानगी सोहळा
यवतमाळ: पूर्वी अतिशय हिंसक असलेल्या मनीषने आता उपचारानंतर पप्पांसोबत काम करणार असल्याची ग्वाही ठाणेदारांना दिली.आज (ता.७ सप्टेंबर) गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर 'नंददीप'ने (Nandadip Foundation) त्याचा रवानगी सोहळा आयोजित केला.तब्बल तीन वर्षांनंतर आपला एकलुता एक कृष्ण परत मिळाल्याने त्याच्या वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही.
नागडा राहून भटकंती करीत असलेला २६ वर्षीय मनीष (manish singh) हा एका महिन्यापूर्वी कुणाच्याही अंगावर धावून जायचा.परंतु,एका महिन्याच्या उपचारानंतर त्याचे पालटलेले रूप पाहून काहींना सुखद धक्का बसला.'नंददीप'मुळे (nandadip foundation) त्याला त्याचे पूर्वीचे संतुलित जीवन परत मिळाले आहे.आज ठाणेदार ज्ञानोबा देवकते,मानसोपचार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम, मनीषचे वडिल विश्वनाथ सिंह,शरद प्रिंटर्सचे शरद उपलेंचवार, निवृत्त मुख्याध्यापक तथा नंददीपचे मार्गदर्शक नरेंद्र पवार,अनंत कौलगीकर यांच्यासह गणमान्य मान्यवरांच्या उपस्थितीत त्याला वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.देवाच्या रूपात तुम्हाला संदीप शिंदे मिळाले आहे ते नसते तर मनीषची अवस्था आजही पूर्वीसारखीच राहिली असती,असे म्हणत देवकते यांनी शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. दरम्यान,उपलेंचवार यांनीही पुढे आता काय करणार अशी विचारणा केली असता आता पप्पांसोबत काम करणार असल्याचे मनीषने सांगितले.
नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्रात (Nanddeep at the homeless psychiatric shelter) मानसोपचार तज्ज्ञ डॉ.श्रीकांत मेश्राम यांनी त्याच्यावर उपचार तर नंदिनी शिंदे, परिचारिका किशोरी मेश्राम व केंद्रातील स्वयंसेवकांनी त्याची काळजी घेतली. त्यानंतर तो आता पूर्णपणे बरा झाला आहे.गत तीन वर्षांपासून बेपत्ता असलेला एकुलता एक मुलगा परत मिळाल्याने त्याचे कुटुंबीय सुखावले आहे.केंद्रातील १५० उपचाराधीन मनोरुग्णांनी टाळ्यांच्या निनादात मनीषला (manish singh) अलविदा केले.
ही आहे मनीषची कहाणी (manish singh's story)
मूळ रायगढ़ जिल्ह्यातील गेरवानी (छत्तीसगढ) (Raygarh, Chhattisgarh) येथे राहणाऱ्या विश्वनाथ सिंह यांचा मुलगा मनीष सिंह (Vishwanath singh's son manish singh) हा गेल्या तीन वर्षांपासून घरून बेपत्ता (Missing from home for three years) होता. त्याला मानसिक आजारातील अतिशय गंभीर समजल्या जाणाऱ्या स्क्रिझोफ्रेनिया या आजाराने ग्रासले होते (Manish was suffering from schizophrenia). त्यातूनच तो भटकंती करीत होता. दरम्यान,५ ऑगस्ट रोजी नागपूर लगतच्या कोंढाळा गावातील एका पुलाखाली तो उघड्यावरील अन्न खात असल्याचे प्रवाशी हेमा जांभुळकर यांच्या निदर्शनास आले.त्यांनी ही माहिती तातडीने नंददीप बेघर मनोरुग्ण निवारा केंद्राचे (Nandadip homeless psychiatric shelter) संचालक संदीप शिंदे (sandip shinde) यांना कळविली. त्यानंतर नंददीप फाउंडेशनचे विकी एकोणकार,अक्षय बानोरे,निशांत सायरे,कार्तिक भेंडे,स्वप्निल सावळे व कृष्ण मुळे यांनी अत्यंत सावधतेने त्याला आपल्या मनोरुग्ण निवारा केंद्रात दाखल केले. त्यानंतर अवघ्या महिन्याभरात त्याच्यावर यशस्वी उपचार झाल्याने त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.


Post a Comment