आज माहिती आणि ज्ञानाचा विस्फोट झाला आहे. चुकीची माहिती, भ्रम आणि अफवांच्या गर्दीत प्रत्येकजण हरवला आहे. अशा काळात 'सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं', हा विश्वास बाळगून आम्ही "द इंक_ऑनलाइन" या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे खरीखुरी माहिती, बातम्या आणि ज्ञानाचे भांडार घेऊन आलो आहोत. शाई (Ink) हे संवादाचे माध्यम आहे. आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हेच माध्यम डिजिटल स्वरूपात आम्ही वापरत आहोत.
केवळ शब्दांनी तुमचे मन जिंकण्यापेक्षा कामातून आपल्या मनात जागा निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या प्रवासात आमची पारख करण्यासाठी आम्हाला वाचायला, ऐकायला आणि पाहायला विसरू नका. यातूनच आमचे मूल्यमापन होऊन आम्ही सत्याच्या अपराजित मार्गावर आहोत की, नाही हे आम्हास कळणार आहे! 'द इंक_ऑनलाइन' या पोर्टलसाठी काम करणारी सर्व मंडळी ही आपल्यातलीच आहेत. हे सर्वजण आपापला व्याप सांभाळून येथे व्यक्त होतात.
आपल्यापैकीही ज्यांना समाजाचा शुभचिंतक म्हणून व्यक्त व्हायचे आहे, त्या सर्वांसाठी हे माध्यम उपलब्ध आहे.
- टीम द इंक_ऑनलाइन

Post a Comment