(Cheating/copy in exam)
एक गट आहे तो प्रामाणिक पणे परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या युवा वर्गाचा आणि दुसरा गट आहे कॉपी (copy) करणाऱ्या बहद्दरांचा.
द इंक न्यूज
अमरावती : तलाठी पेपरफुटी प्रकरण चांगलेच गाजले होते त्यानंतर आता हायटेक कॉपी (copy) करणाऱ्या या उमेदवाराला अटक करण्यात आली आहे. सोमवारी ४ सप्टेंबरला तिसऱ्या पाळीमध्ये हायटेक उपकरणांसह पेपर फोडणाऱ्या एका उमेदवारावर ही कारवाई करण्यात आली.
केंद्रावरील विद्यार्थी काय म्हणाले...
यावेळी परीक्षा केंद्रात असणाऱ्या अन्य उमेदवारांनी सांगितले की, परीक्षा सुरू झाल्याच्या एका तासानंतर या उमेदवारांना पोलिसांनी पकडले. मात्र, पोलिसांनी सांगितले की, परीक्षा सुरू होण्याआधी परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतानाच त्याला पकडण्यात आले. माधव इन्फोटेक अमावती ड्रेमलॅड मार्केट असे या परीक्षा केंद्राचे नाव आहे. परीक्षा केंद्रावरील विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेदवार आत बसून गैरप्रकार करत होता. तर पोलीस याउलट उत्तर देत असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.
पोलिसांकडून सुरू आहे चौकशी
नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथे पोलिसांकडून सध्या आरोपीची चौकशी सुरू आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेला १७ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. परंतु, परीक्षा सुरु झाल्यापासून परीक्षेदरम्यान होणाऱ्या विविध गोंधळ आणि गलथान कारभारामुळे ही परीक्षा चांगलाईचे चर्चेत राहिली आहे. अमरावतीमध्ये गैरप्रकार करणारा उमेदवार पकडण्यात आल्याने पुन्हा एकदा विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Post a Comment