Nature

आता या मराठमोळ्या मॉडेलला डेट करत आहेत ललित मोदी सुष्मिता सेन हिच्याशी लग्नाच्या चर्चांना आता..

आयपीएलचे पहिले फाऊंडर ललित मोदी (lalit modi) हे माजी मिस युनिव्हर्स सुश्मिता सेनला (sushmita sen) डेट करण्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. पण आता या नात्यामध्ये पुन्हा ट्विस्ट आला आहे.


द इंक न्यूज

मुंबई : ललित मोदी (lalit modi) यांनी सुष्मिता (sushmita) बरोबरचा एक रोमान्स करणारा फोटो मागच्या वर्षी शेअर केला होता. या दोघांनी लग्न केल्याच्याही चर्चा व्हायरल झाल्या होत्या. मात्र या दोघांचं आता ब्रेक-अप झालं आहे. आता ललित मोदी (lalit modi) हे महाराष्ट्रातील एका मॉडेलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे बोलले जात आहे.



Lalit Modi Dating This Model : ललित मोदी यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यांच्या नव्या गर्लफ्रेंडची चांगलीच चर्चा रंगली आहे. हरिश साळवेंच्या लग्नात ललित मोदी (lalit modi) आपल्या सुपरमॉडेल सोबत


वकील आणि भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे यांच्या तिसऱ्या लग्नात ललित मोदीही (lalit modi) होते. यावेळी ललित मोदी एका मॉडेलसह (lalit modi affair with model) आले आणि सुरु झाली त्यांच्या नव्या अफेअरची चर्चा. ललित मोदी हे आता मराठमोळी मॉडेल आणि अभिनेत्री उज्वला राऊतला डेट (lalit modi affairs with ujwala raut) करत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. कारण हरिश साळवेंच्या (harish salve) लग्नात या दोघांची उपस्थिती होती. 


कोण आहे उज्वला?

उज्वला राऊतचा जन्म १९७८ मध्ये झाला. ९० च्या दशकातली सुपरमॉडेल म्हणून उज्वला राऊत ओळखली जाते. तिचे वडील मुंबईचे माजी पोलीस उपायुक्त होते. उज्वलाने वयाच्या १७ व्या वर्षीच फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी तिने फेमिना लुक ऑफ द इयरचा किताबही जिंकला होता. त्यानंतर १९९६ मध्येच फ्रान्सच्या एलिट मॉडेल लुक स्पर्धेतही ती होती. त्या स्पर्धेत पहिल्या पंधरा मॉडेल्समध्ये तिचा समावेश होता. 


मॉडेल उज्वला राऊतचा प्रवास 

व्हिक्टोरिया सिक्रेटच्या फॅशन शोमध्ये रँप वॉक करणारी ती पहिली भारतीय ठरली होती. २००२ आणि २००३ या सलग दोन वर्षांमध्ये तिने या शोसाठी रॅम्प वॉक केला होता. एमटीव्ही सुपरमॉडेल ऑफ द इयर या सोमध्ये ती परीक्षक म्हणूनही आली होती. यामध्ये तिच्याबरोबर मिलिंद सोमणही होता. ह्युगो, डॉल्से, गुची, ऑस्कर दे ला रेंटा या मोठमोठ्या आंतरराष्ट्रीय ब्रांडसाठी तिने रॅम्प वॉक केलं आहे. उज्वलाने २००४ मध्ये स्कॉटलँडचा फिल्म मेकर मॅक्सवेल स्टेअरीशी लग्न केलं. मात्र २०११ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 


ललित मोदी - सुश्मिता सेन (lalit modi-sushmita sain) अध्यायाला पूर्णविराम

आता ती ललित मोदींसह (lalit modi) दिसल्याने या दोघांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. या विषयी एका बड्या पेपरने वृत्त दिलं आहे. आयपीएलचे फाऊंडर ललित मोदी (IPL founder lalit modi) हे सुश्मिता सेन यांच्यात प्रेमाचा अध्याय सुरू झाल्याच्या बातम्या जितक्या वेगाने आल्या तितक्याच वेगाने त्यांच्या ब्रेक अपचीही बातमी आली. ललित मोदींनी सुश्मिता सोबतचे खास फोटो पोस्ट केले होते. सुश्मितासाठी ललित मोदी (lalit modi-sushmita sain) यांनी betterhalf असा उल्लेख केला होता. त्यावेळी दोघांनी एकमेकांना डेट करत आहोत अशीही कबुली दिली होती. मात्र ते नातं संपुष्टात आलं आणि या नात्याच्या अध्यायला पूर्णविराम लागला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post