(These professors from Amravati rank among the influential scientists of the world)
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने (Stanford University) जगातील २ टक्के प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये भारतातील ३ हजारावर शास्त्रज्ञांना स्थान दिले आहे. यामध्ये संत गाडगे बाबा अमरावती प्राध्यापकांनी यात आपले स्थान पक्के केले आहे.
द इंक न्यूज
अमरावती : अमेरिकेतील नामांकित स्टॅनफोर्ड विद्यापीठाने (Stanford University) जगातील २ टक्के प्रभावशाली शास्त्रज्ञांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील 3 हजारांपेक्षा जास्त प्राध्यापकांची वर्णी लागली आहे.
यांना मिळाला बहुमान
अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने (Stanford University) जगातील २ टक्के प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये भारतातील ३ हजारावर शास्त्रज्ञांना स्थान दिले असून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या (saint gadge baba amravati university) तीन शास्त्रज्ञांचाही या यादीत समावेश आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ (Stanford vidyapith) दरवर्षी ही क्रमवारी जाहीर करते. अमरावती विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. महेंद्रकुमार रॉय यांच्यासह त्यांचे विद्यार्थी डॉ. अनिकेत गादे व डॉ. अविनाश इंगळे यांना हा बहुमान मिळाला आहे.
डॉ. राय हे सध्या या देशात व्हिजिटींग प्रोफेसर
डॉ. महेंद्रकुमार राय (Dr. Mahendrakumar ray) हे सध्या पोलंड येथे व्हिजिटींग प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत अमेरिकेच्या स्टेनफोर्ड विद्यापीठाने (Stanford University) दोन टक्के शास्त्रज्ञांमध्ये मानांकन दिले आहे. डॉ. रॉय यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर व कुलसचिव डॉ. तुषार देशमुख यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment