Nature

मराठा आरक्षणावर राज्य सरकारकडून मोठ्या निर्णयाची तयारी

कुणबी समाजाला मराठा म्हणून मान्यता देण्यासाठी मनोज जरांगे (manoj jarange) यांचे उपोषण सुरूच

मराठा आरक्षणावर (Maratha Reservationराज्याचे वातावरण चांगलेच तापले. कुणबी समाजाला मराठा म्हणून मान्यता मिळावी यासाठी मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम असल्याने यासंदर्भात मोठा निर्णय घेण्यासाठी राज्य सरकार विचाराधीन आहे.


द इंक न्यूज

मुंबई : कुणबी समाजाला मराठा (maratha) म्हणून मान्यता देण्याचा अध्यादेश काढण्याची मागणी मनोज जरांगे (manoj jarange) यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून याच मागणीसाठी त्यांचं उपोषण (hunger strike) चालू आहे. जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत उपोषण (hunger strike) कायम ठेवण्याचा निर्धार त्यांचा असल्याने यावर राज्य सरकार (state government) काय भूमिका घेईल याकडे लक्ष लागले आहे.



उच्चाधिकार समितीमार्फत अहवाल

मराठा आरक्षणाची (maratha reservation) धग चांगलीच पेटली असून राज्यभरातील मराठा बांधव आरक्षणासाठी (maratha reservation) आंदोलनात उडी घेत आहेत. त्यामुळे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापल्याचं सध्या पाहायला मिळत आहे. राज्य सरकारने यासंदर्भात उच्चाधिकार समितीमार्फत अहवाल मागवण्याचा निर्णय घेतल्यानंतरही जरांगे उपोषणावर (hunger strike) ठाम आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post