Nature

कॅन्सरवर आता मोठे संशोधन...रुग्णांना ओळखणे होणार

द इंक न्यूज

कॅन्सर म्हटले की, जिवाची नको तितकी घालमेल वाढते. यातून सुटका होणार नाही,अशीच अनेकांची मानसिकता बनते. परंतु...आता मात्र यातील रुग्णांना घाबरण्याची भीती नाही.

कॅन्सर रुग्णांवर पूर्वी सरळ ड्रीपच्या माध्यमातून नसांमध्ये इंजेक्शन दिले जात होते. यास सुमारे ३० मिनिटे ते एक तासांचा वेळ लागत होता.




कालावधी अवघ्या सात मिनिटांवर 

काही रुग्णांना मात्र अधिक वेळ लागतो. हे औषध पोहचणे अवघड होते. आता नव्या तंत्रज्ञानात औषध त्वचेत इंजेक्ट करुन दिले जाईल. यामुळे कॅन्सरवरील उपचारांचा कालावधी अवघ्या सात मिनिटांवर येऊ शकतो.


जगातील पहिली संस्था

इंग्लंडमधील शेकडो कर्करोगाच्या रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असे इंजेक्शन बनवणारी ब्रिटनची राज्य-संचालित राष्ट्रीय आरोग्य सेवा संस्थेच्या तपासात एका मोठा आशावादी तपास समोर आला आहे. या संस्थेच्या नव्या संशोधनामुळे कॅन्सरवरील उपचारांचा कालावधी तीन चतुर्थांश कमी होणार असल्याचे समजतेय. असे झाल्यास इतक्या मोठ्या स्तरावर यश संपादन करणारी ही जगातील पहिली संस्था ठरू शकते.


कॅन्सरच्या उपचाराचा वेळ  होणार कमी

मेडिसिन्स अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (MHRA) च्या मंजुरीनंतर, NHS इंग्लंडने जाहीर केले की, इम्युनोथेरपी, एटेझोलिझुमॅबने उपचार केलेल्या शेकडो रुग्णांना ‘त्वचेच्या खाली’ इंजेक्शन देण्यात आले आहे. म्हणजेच आतापर्यंत ज्या शेकडो कॅन्सर रुग्णांचा इलाज इम्युनोथेरपीने होत होता. त्यांना आता त्वचेच्या खाली एटेजोलिजुमॅबचे इंजेक्शन देण्याची तयारी केली आहे. यामुळे कॅन्सरच्या उपचाराचा वेळ कमी होणार आहे.


कॅन्सरग्रस्त पेशींचा शोध आणि नष्ट करण्यास होणार मदत

या नव्या तंत्राने केवळ रुग्णांवर जलद उपचार मिळतील असेच नव्हेत त्यामुळे अधिक रुग्णांची तपासणी करायला डॉक्टरांना वेळ मिळेल. दरम्यान सध्या तयार करण्यात आलेले हे एक इम्युनोथेरपी औषध असून रुग्णांच्या इम्यून सिस्टीमला कॅन्सरग्रस्त पेशी शोधणे आणि नष्ट करण्यास मदत करते. याचा वापर सध्या फुप्फुस, स्तन, यकृत आणि मुत्राशयाच्या कॅन्सरमध्ये होतो.

Post a Comment

Previous Post Next Post