दोन मोठे निर्णय
द इंक न्यूज
‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक १ सप्टेंबरला मुंबईत पार पडली. या बैठकीत २८ विरोधी पक्षातील नेत्यांची हजेरी होती. यामध्ये दोन महत्त्वाचे निर्णय घेतल्या गेले असून तीन ठराव मांडण्यात आले. बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, आम्ही आजच्या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच आगामी काळात आमच्या आघाडीचा कार्यक्रम निश्चित केला आहे. आम्ही २८ पक्ष एकत्र आलो आहोत. आगामी लोकसभा निवडणुकीत आम्ही एकत्र लढलो तर नक्कीच भारतीय जनता पार्टीला पराभूत करू शकतो.
पवार, ठाकरेंचे मानले आभार
पुढे त्यांनी बैठकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांचे आभार मानले.
जागा वाटपाचा तिढा सुटेल
या बैठकीत दोन महत्त्वाच्या गोष्टी ठरल्याची माहिती आहे. इंडियाची समन्वय समिती गठित करण्यात आली आहे. लोकसभेच्या जागावाटपाबाबत दुसरा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांबाबत राज्य स्तरावर चर्चा करून आम्ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहोत.यातून जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता गांधी यांनी बोलून दाखवली.
राहुल गांधी म्हणाले,
आम्ही सर्वजण देशातल्या ६० टक्के लोकांचं प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे आम्ही जर एकत्र निवडणूक लढलो तर भाजपा एकही निवडणूक जिंकू शकणार नाही. मला एका गोष्टीचा आनंद आहे की, या सर्व पक्षांमध्ये घट्ट संबंध तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे मला वाटतं इंडिया आघाडी भाजपाला आगामी निवडणुकीत पराजित करेल.
शरद पवारांचा भाजपावर हल्लाबोल
लोकांनी विश्वासने देशाची सत्ता भाजपाच्या हातात दिली.परंतु, भाजपाविरोधात ठिकठिकाणी नाराजीचं वातावरण आहे. पुढे शरद पवार यांनी भाजपावर हल्लाबोल केला. ते म्हणाले,विरोधकांवर भाजपाचे नेते अहंकारी म्हणून टीका करतात. पण, याने स्पष्ट होतं, अहंकारी कोण आहे… राजकीय पक्ष एकत्र आलेले काहींना आवडत नाही. त्यामुळे त्यांनाच अहंकारी बोललं पाहिजे. देशात अनेक गंभीर समस्या असून शेतकरी, कष्टकरी, तरूणांच्या समस्या वेगळ्या आहेत.

Post a Comment