द इंक न्यूज
बाहुबली या चित्रपटाने जगभरात ज्यास ओळख मिळाली त्या अभिनेता प्रभासचा चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण आता त्याच्या एका फोटोमुळे सर्वचजण चांगलेच चक्रावले आहे.
प्रभासचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो एका चाहतीबरोबर पोज देताना दिसत आहे. पण या फोटोमध्ये त्याच्या डोक्यावर पूर्णपणे टक्कल पडल्याचे दिसत आहे. चित्रपटांमध्ये डॅशिंग अंदाजात दिसणारा प्रभासला खऱ्या आयुष्यात टक्कल पडल्याचं कळताच सर्वांनाच धक्का बसला आहे.
याआधी प्रभासला कोणीही या लुकमध्ये पाहिलेलं नाही. त्यामुळे त्याचा हा फोटो पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण या फोटो मागील सत्य काही वेगळंच आहे. परंतु, व्हायरल होत असलेला प्रभासचा हा फोटो फोटोशॉप केलेला असून यात काहीही तथ्य नाही.
दरम्यान, प्रभास काही दिवसांपूर्वीच आदिपुरुष या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत झळकला होता. तो आता प्रवास प्रोजेक्ट के आणि सलार या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे.

Post a Comment