Nature

आज बर्थ डे असला तरीही राजकुमार रावचे खरे आडनाव तुम्हाला माहीत आहे का?, घ्या मग जाणून

द इंक 

मुंबई : आपल्या अनेक मुलाखतींमध्ये राजकुमारने त्याच्या खऱ्या आडनावाबद्दल सांगितलंय. ते का बदललं याचं कारणही त्याने सांगितले आहे. तो म्हणतो “मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर माझं आडनाव लावत नव्हतो. कारण माझ्या नावामुळे खूप गोंधळ उडत होता कारण बॉलीवूडमध्ये आधीच काही राजकुमार होते.यामध्ये राजकुमार संतोषी, राजकुमार गुप्ता, राजकुमार हिरानी असे दिग्गज होते. त्यामुळे आडनाव बदलण्यामागचं हे कारण असल्याचे राजकुमारने सांगितले.




खरे आडनाव

राजकुमार राव याचे खरे  आडनाव राव नसून यादव आहे, म्हणजेच त्याचं खरं नाव राजकुमार यादव आहे. पण त्याने यादव लावले नाही.



कौटुंबीक पार्श्वभूमी नसतानाही बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान 

अभिनेता राजकुमार राव हा त्याच्या अप्रतिम अभिनयासाठी ओळखला जातो. चित्रपटसृष्टीतील कौटुंबीक पार्श्वभूमी नसतानाही त्याने त्याच्या दमदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलंय. एकापेक्षा एक हटके भूमिका साकारत राजकुमारने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आज ३१ ऑगस्ट रोजी तो त्याचा ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post