Nature

लोकसभा निवडणुकीत 'ही' असेल इंडिया आघाडीची रणनिती

आज ठरला फॉर्म्युला

द इंक  

मुंबई: इंडिया आघाडीची आजपासून दोन बैठका होणारा आहे.यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला ठरला आहे. देशभरातील विरोधकांच्या एकजुटीचा त्यांनी निर्धार केला जाणार असल्याचे या बैठकीतून पुढे आले आहे. यामध्ये जागावाटप हा आघाडीतील महत्वाचा आणि कळीचा मुद्दा असला तरी केवळ जागावाटपाच्या सूत्रापुरतीच ही चर्चा मर्यादित ठेवली जाईल. मतभेद होतील अशी कोणतीही कृती सध्या तरी केली जाणार नसल्याची चर्चा यामध्ये झाली.




शुक्रवारी दिवसभर रणनीतीवर प्लॅनिंग

शुक्रवारी दिवसभर आगामी रणनीतीवर प्लॅनिंग होण्याचे संकेत आहे. यास्तव इंडिया बैठकीसाठी नेतेमंडळी मुंबईत दाखल होऊ लागली आहेत. पाटणा आणि बंगळुरूनंतरची तिसरी बैठक यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विरोधकांची एकजूट अधिक भक्कम कशी होईल यावरच भर दिला जाणार आहे. गुरुवारी सायंकाळी इंडिया आघाडीच्या मानचिन्हाचे अनावरण झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. 


भाजपला कसे रोखणार

इंडिया आघाडीची बैठक ही सर्व विरोधकांमध्ये महत्वाची बैठक आहे.यामध्ये भाजपला रोखण्यावर सर्वाधिक भर दिला जाईल,त्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले जाईल.मतदार संघातील भाजपचे प्राबल्य तपासणीसाठी वेगळा अँक्शन प्लॅन आखल्या जाण्याची शक्यता आहे.


Post a Comment

Previous Post Next Post