Nature

हार्ट अटॅक रोखायचा असेल तर मग...

द इंक  

हार्ट अटॅक रोखायचा असेल तर मग जीवन शैलीत बदल करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञ वेळोवेळी सांगतात. तारुण्यात हृदय विकाराच्या झटक्याने अनेकांचा मृत्यू झाल्याचे आपण दरदिवशी बघतो.त्यामुळे यापासून वाचायचे असेल तर आपण आपल्या हृदयाची काळजी घ्यायला हवी.





स्ट्रेस असा टाळावा 

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे स्ट्रेस वाढत चालला आहे. त्यामुळे अनेकांना विविध आजारांचा आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच तज्ज्ञांकडून आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन वेळोवेळी केलं जातं. परंतु, वाढत्या तणावामुळे हार्ट अटॅकचा धोका संभवतो. त्यामुळे हृदयाची काळजी घेण्यासाठी हेल्दी डाएटसोबतच हृदयाचं आरोग्य राखण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणंही गरजेचं असतं. स्ट्रेस कमी करण्यात एरोबिक व्यायाम फायदेशीर ठरतो.याशिवाय हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी चालणे, पोहणे, सायकल चालवणे हे सामान्य व्यायाम तुम्ही करू शकता.

मारा पुश अप्स 

हृदयाशी संबंधित कार्यप्रणाली चांगली राहण्यासाठी पुश अप्स करणं अतिशय लाभदायक ठरू शकतं. पुश अप्स केल्यानं आपल्या छातीच्या भागातील स्नायूंना चांगला ताण मिळतो आणि यामुळे रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. रक्तवाहिन्यांसाठी हा चांगला व्यायाम आहे. योग्य पद्धतीनं पुश अप्स केल्यानं शरीरामध्ये रक्त प्रवाह नीट सुरू राहतो. यामुळे हृदयाशी संबंधित विकारांचा धोकादेखील कमी होतो. पुश अप्स करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. याची सविस्तर माहिती आपल्या ट्रेनरकडून घ्यावी, त्यानंतरच सराव करावा.


Post a Comment

Previous Post Next Post