वैद्यकीय अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, इतक्या जागांसाठी होणार पदभरती
द इंक
पुणे : जर तुम्ही एमबीबीइस पूर्ण केले असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
पुणे येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळात वैद्यकीय अधिकारी पदांच्या काही रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन किंवा ईमेलद्वारे पाठवावे. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहण्याची तारीख ६ सप्टेंबर २०२३ आहे.
या वेबसाइटवरून मिळवा माहिती
या भरती संबंधित माहितीसाठी तुम्ही ESIC पुणेची अधिकृत वेबसाइट http://www.esic.nic.in तपासू शकता. कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती आपणास मिळेल. कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती २०२३ यामध्ये वैद्यकीय अधिकारी ही जागा असून यात एकूण १४ पदसंख्या आहे.
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने MBBS चे शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे. तसेच शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून सविस्तर माहितीसाठी मूळ जाहिरात आपण बघितली पाहिजे,नोकरी ठिकाण पुणे हे असेल
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर ६९०, बिबवेवाडी, पुणे -३७
मुलाखतीची तारीख - ६ सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट – http://www.esic.nic.in
भरती संबंधित अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी तुम्ही (https://drive.google.com/file/d/1m1IdTiQdVvnV_msF2MS5H1VKot3j3ag5/view) या लिंकवरील जाहिरात बघावी.

Post a Comment