मोर्शी (Morshi Murder) येथील मन हेलावून टाकणारी घटना
खून,बलात्कार,हिंसा,चोऱ्या आदी घटनांचे प्रस्थ माजल्याने आपल्या समाजाला झालं तरी काय असा प्रश्न उपस्थित होतो. अमरावतीच्या मोर्शीमध्ये मायलेकाचा (Murder ) खून करून त्यांच्या मृतदेहाला मोठ्या शिताफीने लपविण्यात आले.
द इंक न्यूज
अमरावती : मोर्शी येथील शिवाजीनगर भागातील एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह (dead body) लाकडी दिवाणाच्या कप्प्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
दार उघडले जात नव्हते
नीलिमा गणेश कापसे (४५) (nilima kapse) आणि आयुष गणेश कापसे (२२) (ganesh kapse) अशी मृतांची नावे आहेत. नीलिमा कापसे यांचे पती गणेश यांचे यापुर्वीच निधन झाले आहे. नीलिमा आणि त्यांचा मुलगा हे दोघेच मोर्शी येथील शिवाजी नगर भागातील घरात वास्तव्याला होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून मोबाइलवर संपर्काचा प्रयत्न करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नीलिमाचे वडील शुक्रवारी कोंढाळीहून मोर्शीला आले. घराचे दार उघडत नसल्याचे पाहून त्यांनी पोलीस ठाणे गाठले.
घरात पसरली दुर्गंधी
घटनेची माहिती मिळताच मोर्शीचे ठाणेदार श्रीराम लांबाडे (police inspector shriramnavami lambade) व त्यांच्या चमूने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी कापसे यांच्या घराच्या परिसरात दुर्गंधी पसरलेली होती. या दुर्गंधीमुळे इथे खुनाची (murder) घटना घडली असावी,अशा चर्चांना या परिसरात उधाण आले होते.
दिवाणाच्या कप्प्यामध्ये नीलिमा व आयुष
पोलिसांनी घराचे दार उघडून पाहिले, तेव्हा त्यांना दिवाणाच्या कप्प्यामध्ये नीलिमा व आयुषचे कुजलेले मृतदेह (dead body) आढळून आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही मोठी गर्दी केली होती. नीलिमा व आयुष यांच्या मृत्यूमागे घातपाताचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नीलिमा या मजुरीचे काम करीत होत्या तर आयुष हा शिक्षण घेत होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Post a Comment