२० बसेस जाळल्या
द इंक न्यूज
नागपूर : मराठा आंदोलनाने (maratha protest) उग्र रूप धारण केले असून याचाच फटका आता एसटी महामंडळालाही (msrtc) बसला आहे.
यामुळे पेटले आंदोलन
सराटी या गावात मराठा आरक्षणाची (Maratha Protest) मागणी करत उपोषणाला बसलेल्या आंदोलकांवर (protesters) पोलिसांनी लाठीचार्ज (Police baton charge) केल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळेच आंदोलन (protest) पेटले. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. आंदोलनामुळे शनिवारी राज्यातील एसटीचे ४५ आगार पूर्णत: बंद होते.
उर्वरित महाराष्ट्रात वाहतूक सुरळीत
एसटी महामंडळाचे (msrtc) राज्यात २५० आगार आहेत. त्यापैकी ४५ आगार शनिवारी बंद होते. या आंदोलामुळे आतापर्यंत एसटीच्या २० बसेस जाळण्यात आल्या. दरम्यान, आंदोलनाची सर्वाधिक झळ बीड, जालना, परभणी, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांना बसली. येथील एसटीचे सर्वच आगार (bus stands) बंद होते. उर्वरित महाराष्ट्रात वाहतूक सुरळीत असल्याची माहिती एसटी महामंडळाच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली गेली.

Post a Comment