बेछूट लाठीमाराला फडणवीस जबाबदार....
मराठा आंदोलकांवर (Maratha protesters) झालेल्या लाठीचार्जच्या (Police baton charge) घटनेने सामाजिक अस्थिरता निर्माण झाली आहे. पोलिसांच्या अशा वागणुकीचा प्रत्यय यवतमाळातही आला.
द इंक न्यूज
यवतमाळ : जालना ( Jalana ) येथे मराठा आंदोलकांवर (maratha protesters) पोलिसांकडून बेछूट लाठीचार्जच्या (Police baton charge) घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी यवतमाळमध्ये उमटले.
सर्व शाखेय कुणबी समाज व मराठा समाज संघटनांच्या वतीने शिवतीर्थावरून मोर्चा काढण्यात आला. बसस्थानक चौकात मोर्चेकऱ्यांनी ठिय्या आंदोलन करीत अचानक चक्काजाम आंदोलन पुकारले. या ठिकाणी टायर पेटविण्याचाही प्रयत्न झाला.
पोलिसांसोबत आंदोलकांची झटापट (Protesters clash with police)
यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयापुढे (yavatmal collector office) मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री (chief minister and vice cheif minister) यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना पोलिसांसोबत आंदोलकांची (protesters) झटापट झाली. पोलिसांनी महिला, वृद्ध, मुलं यांच्यावर कुठलाही विचार न करता हल्ला चढविला त्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (home minister devendra fadnavis) जबाबदार आहेत, असा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी आंदोलकांनी केली. लाठीहल्ला करण्याचा आदेश देणारा सत्तेतील खरा जनरल डायर कोण, याची सखोल चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलनात नानाभाऊ गाडबैले, बिपीन चौधरी आदींसह मराठा समाजाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे (protest) शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते.

Post a Comment