द इंक न्यूज
चांद्रयानच्या यशानंतर आता सूर्यमोहिम हाती घेतली आहे. इस्रोने आज सकाळी ११.५० मिनिटांनी आदित्य एल 1 ने सूर्याकडे झेप घेतली.
श्रीहरिकोटा : सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल 1 नावाचे अंतरयानाने आज सकाळीच सूर्याकडे झेप घेतली.
चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेनंतर भारतीय अंतराळ संस्थेने ( इस्रो ) आज श्रीहरिकोटा येथून आज ( २ सप्टेंबर ) ११. ५० मिनिटांनी प्रक्षेपित झाले आहे.
ताऱ्यांबद्दल मिळवता येणार माहिती
लाँचिंगच्या १२७ दिवसांनी यान एल-१ अचूक कक्षेपर्यंत पोहोचणार आहे.तिथे गेल्यानंतर सूर्याच्या अभ्यासाद्वारे आकाशगंगेतील तसेच इतर विविध आकाशगंगांमधील ताऱ्यांबद्दल बरीच माहिती मिळवता येणार असल्याचे इस्रोने सांगितले.
म्हणूनच आदित्यची रचना
पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटरवरील ‘एल१’ (सूर्य-पृथ्वी लॅग्रॅन्जिअन पॉइंट) येथील सौर वारे आणि सूर्याचे प्रभामंडल यांचे दूरस्थ निरीक्षण करण्यासाठी ‘आदित्य एल१’ची रचना करण्यात आली आहे. ‘पीएसएलव्ही सी५७’ हा शक्तिशाली वाहक ‘आदित्य एल१’ यानाला घेऊन अंतराळात झेपावणार आहे. आजच्या घडीला देशभरातील नागरिकांचे या मोहिमेकडे लक्ष लागले होते.

Post a Comment