द इंक न्यूज
मध्यप्रदेश : आपण जिच्यावर प्रेम केले तीच पुढे आपली नात्याने काकू होईल,असे शंकरच्या ध्यानीमनी नव्हते.
बेरोजगार आहे म्हणून काय माझ्याच काकाला द्याल का तिला...
शंकर (२६) आणि देवयानी (२१) (बदललेले नाव) हे मूळचे मध्य प्रदेशातील बालाघाट शहरात मोठे झाले. दहावीपासून त्यांचे प्रेमसंबंध होते.त्यांना लग्न करायचे होते. मात्र, शंकर हा बेरोजगार असल्यामुळे देवयानी च्या पालकांनी शंकरला लग्नास नकार दिला. आपण पैसे कमवायचे म्हणून तो नागपुरात गेला तिथे एका मोठ्या हॉटेलमध्ये त्याला नोकरी मिळाली. त्यानंतर वर्षभरात तो घरी परत आला तर त्याला जबर धक्का बसला.देव यानीचे त्याचेच काका संजय यांच्यासोबत साखरपुडा उरकला होता.
असे बहरले प्रेम
प्रेयसी देवयानी ही आपल्या काकाची पत्नी म्हणून शंकरच्या कुटुंबात नांदायला आली. मात्र, शंकर आणि देवयानीचे प्रेमसंबंध कायम होते. त्याबाबत काका संजय आणि कुटुंबीय अनभिज्ञ होते. यादरम्यान देवयानीला दोन मुले झाली. सर्व काही सुरळीत चालू होते. कोरोना काळानंतर काका संजय आणि शंकर हे दोघेही नागपुरात एका हॉटेलमध्ये नोकरीसाठी आले. काका-काकू आणि पुतण्यासह पारडीत ते तिघेही एकाच घरात राहायला लागले.तिथेच त्यांचे प्रेम पुन्हा बहरले.
प्यार कभी झुकता नहीं...
नागपूरहून परत आलेल्या शंकरला त्याची प्रेयसी नात्याने काकू म्हणून का होईना पण परत मिळाली. देवयानी आपल्या मुलाबाळांचा,नवऱ्याचा आणि समाजाचाही विचार न करता शंकर सोबत पळून जाण्यास तयार झाली त्यांनी दोघांनी चिठ्ठी लिहून पळ काढला. प्यार कभी झुकता नहीं... याचाच प्रत्यय त्यांनी दिल्याची चर्चा ऐकायला मिळाली. काका संजयला याची माहिती मिळताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. किमान मुलांसाठी तरी पत्नी देवयानी परत येईल, या आशेने काका संजयने आठ दिवस वाट बघितली. त्यानंतर मग घालमेल वाढल्याने काकाने भरोसा सेलमध्ये तक्रार केली.
कॉन्सलिंगने परत संसार मांडला
पळून गेलेल्या दोघांचा अखेर थांगपत्ता लागला. संजय दोन्ही मुलांसह तेथे पोहोचला. तिघांनाही समोरासमोर बसवून त्यांचे (Counceling) समूपदेशन केले. शंकरची समूजत घातली आणि देवयानीला दोन्ही मुलांचा विचार करण्याची संधी दिली. त्यानंतर दोघांनाही आपली चूक उमगली. त्यानंतर शंकरने थेट आपले गाव गाठले तर काका-काकूंनी आपला संसार पुन्हा मांडला.

Post a Comment