Nature

आजपासून राज्यपाल तीन दिवस उपराजधानीत

द इंक न्यूज

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस आज शनिवार २ सप्टेंबरपासून तीन दिवस उपराजधानी नागपूर दौऱ्यावर आहेत.




राज्यपाल शनिवारी रात्री नागपूर येथे पोहोचतील. आज त्यांचा मुक्काम राजभवन येथे आहे. उद्या  रविवारी ३ सप्टेंबर रोजी ते  वर्धा  येथे जाणार असून तेथे महाकाली शिक्षण संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहतील. सोमवारी ४ सप्टेंबरला  नागपूर विद्यापीठाव्दारे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.  हा कार्यक्रम आटोपल्यानंतर ते मुंबईला रवाना होतील.

Post a Comment

Previous Post Next Post