काकाच्या कुकर्मावर सोलापूरकर संतापले
आपल्याच पुतणीवर लैंगिक अत्याचार होत असल्याची माहिती असताना कुकर्म करणाऱ्या काकाविरोधात पीडितेचे वडील गप्प होते. या एकाच प्रश्नाने अवघ्या सोलापूर शहरात असंतोष पसरला होता.
द इंक न्यूज
सोलापूर : लैंगिक विकृती कोणत्या थराला जाईल,याचा काही नेम नाही. अशी बरीच प्रकरणे आपणास माहीत असेल, पण ही केस निराळी आहे.इथे आपला भाऊच अपराधी होता.तो आपल्याच मुलीवर लैंगिक अत्याचार करत होता.याची माहिती वडिलांना होती तरी तेसुद्धा एका कारणाने गप्प होते.
एका पाठोपाठ तीन मुली...म्हणूनच
आपल्याकडे वंशाचा दिवा पाहिजे म्हणून सर्वाधिक पसंती मुलाला दिले जाते. एका पाठोपाठ मुलगी होत असेल तर सर्व दोष महिलेला दिला जातो. याविषयी आपल्या समाजात आजही घोर अज्ञान पसरले आहे. या प्रकरणात एका पाठोपाठ तीन मुली झाल्याने नाराज असलेल्या वडिलांनी बायकोसह आपल्या मुलींना वाऱ्यावर सोडले होते. त्यामुळे मुलींच्या भरण पोषणाची जबाबदारी आईवर पडली. ती एका खासगी कारखान्यात कामावर जाऊन आपला उदरनिर्वाह करायची.
प्रकार असा आला उजेडात
खासगी कारखान्यात कामावर आई गेल्यानंतर ह्या मुली घरी एकट्या असायच्या दरम्यान, पीडित मुलीचा चुलता अधुनमधून भावजयीच्या घरी यायचा. एकेदिवशी पीडित मुलीला त्रास जाणवू लागला असता आईने तिची विचारपूस केली. तेव्हा पीडित मुलीवर चुलत्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा धक्काप्रकार उजेडात आला.
मुलगी झाली म्हणजे आईच दोषी असते का?
लागोपाठ तीन मुली होत असतील तर यास सर्वस्वी जबाबदार म्हणून आईला धरले जाते. परंतु , हे सत्य नाही. वैद्यकशास्त्र सांगते की, गुणसूत्राच्या आधारे मुलगा किंवा मुलगी जन्माला येते. मुलगी जन्माला आली असेल तर त्यास कुणा एकाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. निसर्गाने आपल्या झोळीत जे टाकले त्याचा पूर्ण मनाने स्वीकार स्वीकार करावा,असे शास्त्र सांगते.
चुलता आणि पिता दोघेही जाणार तुरुंगात
अत्याचार होत असल्याची बाब पित्याला ठाऊक असतानाही त्याने याची वाच्यता केली नाही. त्यामुळे चुलता आणि पिता या दोघांविरूध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यापैकी बेजबाबदार पित्याला अटक केली आहे. यासंदर्भात जेलरोड पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने आपला पती आणि दिराविरूध्द फिर्याद नोंदविली असून त्यानुसार गुन्हे दाखल झाले आहे.

Post a Comment