Nature

मराठा आरक्षणासाठी एकाने केली आत्महत्या,ग्रामस्थांचा दावा

राज्यभर मराठा आरक्षणासाठी वेगवेगळी आंदोलने केली जात आहेत. त्यातच माडज येथील किसन माने या तीस वर्षीय तरूणाने बुधवारी ६ सप्टेंबर रोजी गावातील शिवकालीन तलावात उडी घेवून आत्महत्या केली. मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच त्याने आत्महत्या केली असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.


द इंक न्यूज

धाराशिव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठीच गावातील एका तरूणाने आत्महत्या केली असा दावा उमरगा तालुक्यातील माडज येथील ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे बुधवारी सायंकाळपासून उमरगा तालुक्यात तणाव वाढला होता. दरम्यान, रेस्ट हाऊससमोर दोन तरूणांनी कार पेटवून देत मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. 




या दोन गावात पाळला कडकडीत बंद,आगारातून बस नाही

ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेवून महसूल व पोलीस प्रशासनाने याबाबत वरिष्ठांपयर्ंंत माहिती पोहोचवली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीस प्रशासन माडज येथील घटनेवर लक्ष ठेवून होते. घटनेनंतर सकल मराठा समाजाकडून उमरगा शहर बंदचे आवाहन समाजमाध्यमांवर करण्यात आले. त्यामुळे गुरूवारी उमरगा शहरासह नारंंगवाडी आणि माडज या दोन्ही गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. उमरगा बस आगारातून एकही बस सोडण्यात आली नाही.


आंदोलकांनी पेटवली कार 

आत्महत्त्या केलेल्या तरूणाचा मृतदेह माडज येथून उमरगा शहरापर्यंत घोषणाबाजी करीत आणण्यात आला. यावेळी विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर आंदोलनकत्यार्र्ंनी त्यांचा मोर्चा उपविभागीय कार्यालयाकडे वळविला. मोठ्या संख्येने आंदोलक उपविभागीय कार्यालयासमोर जमा झाले. त्याचवेळी शासकीय विश्रामगृहासमोर तीन ते चार तरूणांनी मुख्य रस्त्यावर एक जुनी कार पेटवून दिली. त्यानंतर या तरूणांनी मराठा आरक्षणासाठी जोरदार घोषणाबाजी केली. थोड्या वेळानंतर उपविभागीय कार्यालयात जमा झालेली गर्दी हळुहळू पांगली आणि त्यानंतर माडज येथे मयत तरूणावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post