Nature

आरक्षणावर आता मोहन भागवतांचे वक्तव्य,म्हणाले

आरक्षणावर आर एस एस चे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी वक्तव्य केलं आहे. जोपर्यंत भेदभाव संपत नाही,तोपर्यंत आरक्षण दिले जावे, हे आरक्षण संघालाही मान्य आहे.परंतु त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टोला लगावला आहे.


द इंक न्यूज

मुंबई : मुळात संघ हा आरक्षण विरोधी आहे. संविधानाने दिलेले आरक्षण संपवण्याची भाषा संघाकडून सातत्याने केली जाते. डॉ. भागवत यांना खरेच आरक्षण मान्य असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आरक्षण कधी लागू करणार हे त्यांनी आधी स्पष्ट करावे, असा टोला काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी लगावला आहे.

काय म्हणाले भागवत 

ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत व भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरुच रहायला हवे, संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे.परंतु, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे हे विधान दिशाभूल करणारे व फसवे असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. 


सचिन सावंत यांचा टोला?

डॉ मोहन भागवत यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, वर्षानुवर्ष ज्या वंचित, पिडीत जातींवर अन्याय केला गेला त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संविधानाने आरक्षणाची व्यवस्था केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व त्यांच्या मुशीत जन्माला आलेला भाजपा यांना मात्र जाती आधारीत आरक्षण मान्य नाही हे वेळोवेळी दिसून आले आहे. मराठा आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणारी सेव्ह मेरीट सेव्ह नेशन या संस्थेचे पदाधिकारी संघाचेच कार्यकर्ते होते. मराठा आरक्षणाला न्यायालयात विरोध करणारे इतरही भाजपाशी संबंध ठेवून आहेत यात सर्व काही आले‌,असल्याचे सावंत म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार म्हणातात

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आर्थिक सल्लागार विवेक देवरॉय यांनीही नुकतेच संविधान बदलण्याची भाषा केली होती.


आरक्षण हे आर्थिक आधारावर हवे

२०१७ साली संघाचे प्रचारप्रमुख मनमोहन वैद्य यांनी जयपूर साहित्य संमेलनात आरक्षणाला कालमर्यादा हवीच असे विधान केले होते. अंगाशी आल्यावर मात्र संघ सारवासारव करत असतो. सरसंघचालक गोलवकर यांनी डॉ. आंबेडकर यांनी संविधानात अनुसुचित जाती व जमातीसाठी १० वर्षांसाठी आरक्षणाची तरततुद केली होती पण ती वारंवार वाढवली गेली, समाजात इतर घटकही गरिब आहेत त्यामुळे आरक्षण हे आर्थिक आधारावर हवे असे विचारधनात म्हटले आहे.


‘चूल आणि मूल’ हीच संघाची मानसिकता 

हेडगेवारांनी महिलांना वेगळी संघटना काढण्याचे निर्देश देतानाच्या मनुवादी मानसिकतेत संघ अजूनही अडकला आहे यात शंका नाही. गोळवलकर महिला आरक्षणाला इझम् मध्ये अडकवतात. महिलांच्या बाबतीत ‘चूल आणि मूल’ हीच आजही संघाची मानसिकता आजही दिसते आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकारिणीत आजही एकाच उच्च जातीच्या लोकांचा भरणा आहे. संघात इतर जातीचे लोक व महिला यांना संघाच्या कार्यकारिणीमध्ये स्थान नाही.


भाजपाचे सरकार अडचणीत येत असल्याने  विधाने बदलतात

सध्या देशभर विविध जातींच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आहे, त्यामुळे लोकांची मानसिकतेचा अंदाज आल्यानेच डॉ. भागवत यांनी आरक्षण असायला हवे असे विधान केले असावे. परिस्थिती तसेच भाजपाचे सरकार अडचणीत येत आहे हे पाहून तेही विधाने बदलवतात हे आधीची त्यांची विधाने पाहता लक्षात येईल. असेही सावंत म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post