वाशीम जिल्हा परिषद कार्यालयानेही बऱ्याच दिवसानंतर गट क संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे.
द इंक न्यूज
वाशीम : जिल्हा परिषद वाशिमने गट क संवर्गातील विविध १८ प्रकारातील २४२ पदासाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी १२ हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले असून परिक्षा शुल्कातून अंदाजे १ कोटी १८ लाख रुपयाचा महसूल झेडपी प्रशासनाच्या खात्यात जमा झाला आहे.
ही असणार पदे
वाशीम जिल्हा परिषदेत विविध पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका ( महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ सहाय्यक, वरीष्ठ सहाय्यक, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, लघुलेखक उच्च श्रेणी, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक अशा विवधि २४२ पदाची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती.
परीक्षेचे वेळापत्रक?
त्यानुसार आवश्यक त्या पदाकरीता शैक्षनिक पात्रतेनुसार ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार राखीव प्रवर्गातून नऊशे तर खुल्या प्रवर्गातून एक हजार रुपये परिक्षा शुल्क आकारण्यात आले होते. त्यानुसार २४२ पदाकरीता १२ हजार ३५२ अर्ज प्राप्त झाले असून परिक्षा शुल्कापोटी १ कोटी १८ लाख रुपयाचा महसुल जमा झाला आहे. दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे परीक्षार्थी वेळापत्रकाच्या प्रतीक्षेत दिसत आहेत.

Post a Comment