राधाकृष्ण विखे पाटलांसोबत काय घडले
मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने अवघा महाराष्ट्र ढवळून निघत असताना आता धनगर आरक्षणाचा मुद्दाही तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर दौऱ्यावर त्यांच्यावर भंडारा टाकण्याचा प्रकार समोर आला असून यावरून आता धनगर आरक्षणाचा मुद्दा नव्याने पेटण्याची शक्यता आहे.
द इंक न्यूज
सोलापूर : राज्याचे महसूलमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना त्यांच्या डोक्यावर भंडारा टाकण्यात आला. विखे पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात थांबले असताना आज सकाळी त्यांना भेटण्यासाठी धनगर कृती समितीचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते आले होते.
निवेदन वाचत असताना
यावेळी बंगाळे नामक धनगर आरक्षण कृती समितीचा पदाधिकारी एक निवेदन घेऊन तिथे दाखल झाला. राधाकृष्ण विखे पाटील यांना त्याने निवेदनही दिलं. मात्र, विखे पाटील हे निवेदन वाचत असताना त्यानं खिशातून एक पुडी काढून त्यातला भंडारा विखे पाटलांच्या डोक्यावर ओतला.

Post a Comment