Nature

समांथा राजकारणात प्रवेश करणार ? लवकरच करणार घोषणा

नागा चैतन्य सोबत काडीमोड घेतल्यानंतर आता लवकरच समांथा राजकारणात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 

(Samantha Ruth prabhu political entry) 

द इंक न्यूज

चेन्नई : साऊथची सुपरस्टार समांथा रुथ प्रभू (samantha prabhu) सध्या तिच्या खुशी चित्रपटामुळे ('khush movie) सध्या चर्चेत आहे. या चित्रपटात समांथाबरोबर अभिनेता विजय देवरकोंडा (vijay devarakonda) मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. दरम्यान समांथाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. 




समांथा के. चंद्रशेखर राव (k. Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (BRS) मध्ये सामील होऊ शकते. मात्र, अद्याप समांथा किंवा पक्षाकडून याबाबत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.


शेतकऱ्यांच्या नेहमीच पाठीशी

समांथा (Samantha) ही नेहमीच सामाजिक भान जपते.विशेष म्हणजे तिचा शेतकऱ्यांना नेहमी पाठिंबा असतो. यापूर्वीही ती अनेकदा तेलंगणातील जनता आणि शेतकऱ्यांना समर्थन देताना दिसून आली होती. इतकंच नाही तर ती तेलंगणाच्या हातमागाच्या कपड्यांची ब्रँड ॲम्बेसिडर आहे. 



मायोसिटिस नावाच्या स्वयंप्रतिकार रोगाशी झुंज

समंथाने (Samantha) काही दिवसांपूर्वी पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने आपल्या आजारपणामुळे एक वर्षाचा ब्रेक घेत असल्याचे जाहीर केले होते. ती मायोसिटिस नावाच्या स्वयंप्रतिकार रोगाशी सध्या झुंज देत आहे. २०२२ मध्ये तिने याबाबत खुलासा केला होता. 


वरुण धवनसोबत झळकणार

बॉक्स ऑफिसवर तिचा शकुंतलम चित्रपट अपेक्षित कमाई करु शकला नाही. आता ‘खुशी’ (Khushi) चित्रपटानंतर ती लवकरच ‘सिटाडेल इंडिया’ (Sitadel India) चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिच्याबरोबर वरुण धवनची मुख्य भूमिका असेल. बॉक्स ऑफिसवर ‘खुशी’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर समांथाने चाहत्यांचे आभार मानले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post