Nature

तलाठी परीक्षेत असा होत होता घोटाळा

स्पर्धा परीक्षांमध्ये (Competitive Examinations) स्वतः चे नशीब आजमावण्यासाठी बहुतांश सामान्य कुटुंबातील युवावर्ग धडपडतो.परंतु,याच परीक्षांमध्ये घोटाळा (exam scam) होत असल्याने आता त्यांच्या जागा कुणीतरी पैसे देऊन बळकावत आहे. 

(Such a scam was happening in Talathi exam) 


नागपूर : तलाठी परीक्षेत (talathi exam scam) गैरप्रकार होत असल्याने त्याचे तीव्र पडसाद उमटत आहे. या परीक्षेत कॉपी लाखो रुपयात विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणवर्गामध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.



हा बाबा कोण? 

तलाठी परीक्षेत (talathi exam scam) थेट परीक्षा केंद्रात उत्तरे पुरवली जात आहे. परीक्षेच्या उत्तरपत्रिकेची कॉपी तीन लाखांत विकली जात आहे. अटकेतील आरोपी नागरे इऑन परीक्षा केंद्रातील एका कर्मचाऱ्याच्या मदतीने परीक्षा केंद्रावर उत्तरे पाठवत होता. उत्तरपत्रिका पाठवण्यासाठी एका विद्यार्थ्याकडून तीन लाख रुपये घेत होता. नागरेच्या मोबाइलमध्ये त्या कर्मचाऱ्याचा नंबर ‘बाबा’ या नावाने सेव्ह असल्याचे समोर आले.त्यामुळे हा बाबा म्हणजे नेमके कोण याचा शोध घेतल्या जात आहे.


रॅकेटचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत

चिकलठाण्यातील इऑन परीक्षा केंद्राबाहेरून परीक्षार्थीला उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असलेला राजू भीमराव नागरे याला पोलिसांनी ५ सप्टेंबरला अटक केली होती. या रॅकेटमध्ये ७ जण आरोपी असल्याचे पुढे आले आहे. या रॅकेटचे धागेदोरे थेट मंत्रालयापर्यंत (ministry) असल्याने पोलीस त्याच दिशेने तपास करत आहेत.


टेलिग्रामवर काय होते ? 

एमआयडीसी सिडको पोलीस दुचाकी चोराच्या शोधात असताना त्यांना केंद्रासमोर चार तरुण संशयास्पद आढळून आले. पोलिसांनी त्यांना हटकले असता त्यांनी तेथून धूम ठोकली. राजू मात्र हाती लागला. त्याच्या खिशात मास्टर कार्ड, दोन मोबाइल मिळाले. त्याच्या टेलिग्रामवर ३४ प्रश्नांचे छायाचित्र होते.


सांगलीतही होता गुन्हा

राजूने सकाळी ९ वाजेच्या परीक्षेत एका उमेदवाराला उत्तरे पुरवल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती आले आहे. परीक्षा केंद्रातून हे रॅकेट चालत असून एका परीक्षार्थीला उत्तरपत्रिकेची चिठ्ठी देण्यासाठी आतील कर्मचारी ३ लाख रुपये घेत असल्याचे तपासात सिद्ध झाले आहे. या रॅकेटची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये आणखी ६ आरोपींची नावे समोर आली आहेत. अटक केलेल्या आरोपीविरुद्ध सांगलीत २०२१ मध्ये परीक्षेत घोटाळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Post a Comment

Previous Post Next Post