(Sangali Social Media Viral Post)
जगण्याचा कंटाळा आला म्हणून मरतोय..! असे पोस्ट करत एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
द इंक न्यूज
सांगली : मला जगण्याचा कंटाळा आला असल्याची चिठ्ठी लिहून चिठ्ठीचा संदेश (Social Media) समाज माध्यमावर प्रसारित करीत जत तालुक्यात एका मानेवस्ती येथे राहणाऱ्या भिमु पांडूरंग माने (bhimu pandurang mane) (वय ३०) याने घराजवळ असलेल्या झाडाला रात्री गळफास लावून घेतला हा प्रकार शनिवारी (२ सप्टेंबर) सकाळी उघडकीस आला.जतपासून शेगाव रस्त्यावरील माने वस्तीवर ही घटना घडली.
आई-वडिलांबद्दल काय होते चिठ्ठीत
ही आत्महत्या असल्याचे शनिवारी निदर्शनास आले. तत्पुर्वी त्यांने चिठ्ठी लिहून आपणास जगण्याचाच कंटाळा आला आहे. आपल्या मृत्यूबद्दल आई-वडिलांना कोणताही त्रास देउ नये अशी चिठ्ठी त्यांने दारूच्या नशेत लिहीली असल्याचे सांगण्यात आले. या चिठ्ठीचे छायाचित्र त्यांने निकटचे नातलग व स्नेह्यांना समाज माध्यमावर (social media) पाठविले होते. मृत माने हा अविवाहित होता. तर तो चालक म्हणून काम करीत होता.

Post a Comment