सोशल मीडियावर (social media) जाहीरपणे जीव देण्याची जणू नवा ट्रेंड पुढे आला आहे.
द इंक न्यूज
कोल्हापूर : तालुक्यातील पुलाची शिरोली (तालुका हातकणंगले) येथे प्रेमी युगलांनी instagram इंस्टाग्रामवर पोस्ट टाकून आत्महत्या केली आहे.
सानिका नानासाहेब निकम (वय 16) आणि अरबाज शब्बीर पकाले (वय 18, रेणुका नगर शिरोली पुलाची) असे प्रेमी युगुलाचे (love couple) नाव आहे.
म्हणून उचलले टोकाचे पाऊल
सोशल मीडियावर (social media) पोस्ट करीत भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलांनी आत्महत्या केली या घटनेने समाजमन ढवळून निघाले. सानिका - अरबाज या अल्पवयीन युवतींचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र या प्रेमाला दोन्ही कुटुंबीयांचा विरोध होता.
हे प्रेमाचे नव्हे;शिक्षणाचे वय
हे प्रेमाचे नव्हे;शिक्षणाचे वय आहे, अशी त्यांची समजूत घातली जात होती. मात्र तरीही हे प्रेमीयुगल आपल्या मतावर ठाम होते. कुटुंबियांच्या विरोधाला त्यांनी दाद दिली नव्हती. यातूनच त्यांनी जीवन संपवण्याचा धाडसी पण दुर्दैवी निर्णय घेतला होता.
इंस्टाग्राम (Instagram) वर काय म्हटले होते?
ज्याच्यावर प्रेम केले त्याच्यासोबत मरायला पण तयार राहा, नाहीतर प्रेम करू नका. जात धर्म बघून प्रेम करू नका, सगळीच तशी नसतात,' असे म्हणत फोटो शेअर केले होते.
असे संपवले जीवन
रात्री सानिया घरातू पळून गेली. तिचा शोध नातेवाईकांनी घेतला होता. मात्र ती आढळली नव्हती. घरातून निघाल्यानंतर ती थेट अरबाजच्या घरी पोहचली. तेथे दोघांनी नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली.

Post a Comment