Nature

'श्रीं'च्या पुण्यतिथीनिमित्त शेगावात जात असाल तर

द इंक न्यूज

बुलढाणा : हजारो भक्तांच्या उपस्थितीत संत गजानन महाराजांचा ११३ वा पुण्यतिथी उत्सव संतनगरी शेगावात साजरा होत आहे. दरम्यान,विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून तुम्ही दर्शनासाठी जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.




अशी आहे रूपरेषा

शनिवारी सकाळी श्री गणेशयाग व वरुनयागास ब्रम्हवृंद यांच्या हस्ते विधिवत पुजन करून उत्सवाला सुरुवात करण्यात आली. यानिमित्त संत गजानन महाराज संस्थानमघ्ये ५ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहे. दररोज सकाळी ६ ते ६.३० काकडा, सकाळी ७.१५ ते ९.१५ भजन, दुपारी ४ ते ५ प्रवचन व हरिपाठ ५.३० ते ६, सांयकाळी ८ ते १० कीर्तन पार पडणार आहे. 


श्रींच्या मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मंदिर परिसरात केळीचे खांब व तोरण लावण्यात आले आहेत. भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता वन-वे (एकेरी मार्ग) करण्यात आला आहे. त्यात श्रींचे समाधी दर्शन, श्रीमुख दर्शन, महाप्रसाद, पारायण कक्ष मंडप इत्यादी व्यवस्था आहे. पश्चिम भागात संस्थानद्वारा १२ मीटर रूंदीचा नवीन रस्ता करण्यात आला आहे. शेकडो दिंड्या, पालख्या तसेच शोभायात्रा व मिरवणुकीमुळे गर्दीमध्ये आणखी वाढ होत आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून दिंड्या, पालख्या, शोभायात्रा व मिरवणुकी नवीन रस्त्यावरील श्री मंदिर परिसराचे पश्चिमद्वारातून आत येतील. दिंड्या, पालख्या, शोभायात्रा व मिरवणुकी दक्षिण द्वारातून मार्गस्थ होतील. 


नगर परिक्रमा या दिवशी होणार

२० सष्टेबर रोजी सकाळी ७ ते ९ दरम्यान भरतबुवा म्हैसवाडीकर यांचे श्रींचे समाधी सोहळानिमित्त कीर्तन होणार आहे. सकाळी १० वाजता गणेशयाग व वरुनयागाची पुर्णाहूती व अवभृतस्नान होईल. दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याचे पुजन होवून श्रींच्या पालखीचे रथ, मेणा, दिंड्या पताका टाळकरी, अश्‍वासह परिक्रमा निघेल. सायंकाळी मंदिरात श्रींची महाआरती व टाळकरी यांचा आकर्षक रिंगण सोहळा व श्रींची आरती होणार आहे. रात्री ८ ते १० भरतबुवा म्हैसवाडीकर यांचे कीर्तन होणार आहे. २१ सष्टेबर रोजी श्रीधरबुवा आवारे खापरवाडी यांचे सकाळी ६ ते ७ काल्याचे कीर्तन व त्यानंतर दहीहंडी गोपाळकाला कार्यक्रम होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post