द इंक न्यूज
वर्धा : शेतकऱ्यांचा महत्वाचा सण असलेल्या पोळ्याची सर्वत्र धामधूम सुरू होती. परंतु, देवळी तालुक्यातील गुंजखेड येथे दुर्दैवी घटना घडली.
येथील राजू पुंडलिकराव राऊत हे मुलगा चंद्रकांत सोबत याच परिसरात असलेल्या एका तलावावर बैलजोड़ी धुण्यास गेले होते. बैल धुत असतानाच वडिलांचा तोल गेला. ते घसरून पाण्यात पडले त्यांना वाचविण्यासाठी मुलगा चंद्रकांत हा पाण्यात उतरला. मात्र, पाणी खोलवर असल्याने याचा दोघांनाही अंदाज आला नाही. ते पाण्यात बुडाल्याने त्यांचा जागीच अंत झाला.

Post a Comment