द इंक न्यूज
यवतमाळ : शहरात गुंड प्रवृत्ती (bully tendencies) फोफावत चालली आहे. कॉटन सिटी,शांत शहर आता क्राईम सिटी (Yavatmal Crime City) झाली आहे. वाळू डेपोची तक्रार मागे घेण्यासाठी एकाने बंदुकीचा (Gun) धाक दाखविला.
वाळू डेपोची तक्रार मागे घेण्यासाठी बंदुकीच्या (Gun) धाकावर पाच लाखाच्या खंडणीची मागणी करण्यात आली. ही घटना बुधवारी १३ सप्टेंबरच्या रात्री मारेगाव कोसारा शिवारात घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला गजाआड केले. ( A gun to the head, who is this Lallya of Yavatmal?)
कोण आहे हा लल्ल्या (Lalit Arun Gajbhiye)
ललित उर्फ लल्ल्या अरुण गजभिये (३३, रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी, यवतमाळ), असे या आरोपीचे नाव आहे. बंदुकीच्या धाकावर धमकाविल्याची तक्रार सय्यद मन्सूर सय्यद दाऊद (३४, रा. डेहणकर ले-आउट) यांनी दिली. २०३२-२४ या कालावधीसाठी कोसारा येथील वर्धा नदीच्या वाळूघाटाचे टेंडर सय्यद मन्सूर याने घेतला असून, डेपोत वाळूसाठा साठवून ठेवला आहे.
पैसे नाही दिले तर...
३० ऑगस्ट रोजी ललितने डेपोत काम करणार्या विकास झंजाळ याच्या मोबाइलवर फोन केला. मन्सूरचा भाऊ कादर फोन उचलत नाही. त्याच्याकडून पाच लाख रुपये हप्ता घ्यायचा आहे. पैसे दिले नाही तर तक्रार करण्यात येईल, असा निरोप दिला.
तहसीलदारांनी टाकली रेड
या गंभीर प्रकरणाची जिल्हाधिकार्यांकडे तक्रार होताच यवतमाळ तहसीलदारांनी गोधणीरोड स्थित असलेल्या खदानीवर छापा टाकला. परंतु, तिथे गैरप्रकार आढळून आला नाही.
डोक्याला लावली बंदूक (A gun to the head)
बुधवारी मन्सूर हा आपल्या कामगारासह कोसारा शिवारात उभा असताना ललित गजभिये आपल्या एक अन्य साथीदारासह कारने आला. त्याने सांगितल्यानुसार वाळू घाटाचा हप्ता दिला नाही, असे म्हणत बंदूक मन्सूरच्या डोक्याला लावली. तर, दुसर्या साथीदाराने चाकू पोटाला लावला. त्याने आरडाओरड करताच कामगार धावून आले. मन्सूर सेठला सोडून द्या. तुम्हाला हप्ता मिळून जाईल, अशी विनंती कामगारांनी केली. त्यामुळे ललित घटनास्थळावरून निघून गेला.
यवतमाळातून केली अटक (arrested from yavatmal)
सय्यद मन्सूर याने मारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे वेगात फिरवून ललित गजभिये याला यवतमाळातून अटक केली असून पुढील तपास ठाणेदार जनार्दन खंडेराव, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर सावंत करीत आहेत.

Post a Comment