Nature

या जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस

द इंक न्यूज

पुणे : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असून शनिवारी राज्यात मुसळधार पाऊस (Heavy rain will fall) पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.




विदर्भातील या जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा 

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदीया जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (orange alert) दिला. तर बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला. खानदेशातील जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातही ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


मध्य महाराष्ट्रातील इथे बरसणार 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, नगर, नाशिक आणि कोल्हापूर तर कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने शनिवारी विर्भातील यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना तसेच खानदेश जिल्ह्यातही ऑरेंज अलर्ट विभागाने दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post