द इंक न्यूज
यवतमाळ : आरक्षणासाठी एकाने विष घेतल्याची घटना उमरखेड येथे घडली.
थेट मंडपात घेतले विष
तिथे येथे गेल्या सात दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषण मंडपात आरक्षणाची मागणी करत एका तरूणाने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.
कोण आहे हा तरुण?
अशोक देवराव जाधव (३५) रा. जेवली, ता उमरखेड असे या तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या आंदोलनास गालबोट लागले आहे.

Post a Comment