द इंक न्यूज
मुंबई: विकृत मानसिकता कोणत्या थराला जाईल याचा नेम नाही. मृतदेहाचे तुकडे तुकडे करून त्याची विल्हेवाट लावली जाते. यापूर्वीही असे प्रकार पुढे आले आहेत. आता एका मेकअप आर्टिस्टची हत्या त्याच पद्धतीने केल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे.
विवाहित प्रियकराने केली हत्या
ती मागील एक महिन्यापासून बेपत्ता होती. नायगावमधील मेकअप आर्टिस्ट जया महत (२९) असे तिचे नाव आहे. तिच्याच प्रियकराने तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून गुजराथच्या वलसाड येथील खाडीत फेकून देण्यात आला आहे. याप्रकरणी नायगाव पोलिसांनी प्रियकर मनोहर शुक्ला (४३) याला अटक केली आहे.
असा घडला थरार
२९ वर्षीय मयत नयना महंत ही १२ ऑगस्ट पासून बेपत्ता होती. याबाबत नायगाव पोलीस ठाण्यात तिच्या बहिणीने तक्रार दाखल केली होती. ही तरुणी सिनेमात केशभूषाकार म्हणून काम करते. ती नायगाव पूर्वेच्या सनटेक इमारतीत रहात होती. प्रियकर मनोहर शुक्ला याने पाण्यात बुडून तिची हत्या केली आणि मृतदेह सुटकेस मध्ये टाकला होता. ही सुटकेस त्याने गुजरातच्या वलसाड येथे टाकून दिली होती. त्यानंतर आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
अशी झाली हत्या उघड
नयना नायगाव मध्ये एकटी रहात होती. १२ ऑगस्ट पासून तिचा फोन बंद येत असल्याने तिची बहिण जयाने तक्रार दिली होती. ज्या इमारतीत नयना रहात होती, त्या इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी मनोहऱ शुक्ला सुटकेस घेऊन जात होता सोबत त्याची पत्नीदेखील होती.
प्रेमसंबंध होते की नाही?
मयत नयना पूर्वी वसईला रहात होती. सिनेसृष्टीत काम करणार्या आरोपी मनोहर शुक्ला बरोबर तिचे प्रेमसंबंध होते. मात्र तो विवाहित असल्याचे समजल्यानंतर तिने हे संबंध तोडले आणि त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. ती तक्रार मागे घेण्यासाठी शुक्ला तिच्यावर दबाव टाकत होता. त्यामुळे ही हत्या केली असल्याची शक्यता नायगाव पोलिसांनी व्यक्त केली.

Post a Comment