द इंक न्यूज
सातारा: सोशल मीडियावर पोस्ट करणे तणावाचे कारण बनत आहे.असाच प्रकार सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे रविवारी १० सप्टेंबरला घडला. एका व्यक्तीने आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला.पोलिसांनी मात्र ही परिस्थिती आटोक्यात आणला आहे. (Posting on social media led to tension)
काय म्हणाले एसपी
या घटनेनंतर साताऱ्यात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. याबाबत अफवा पसरत असल्याने सातारा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी (११ सप्टेंबर) निवेदनातून माहिती दिली आहे, ते म्हणाले“१० सप्टेंबर २०२३ रोजी पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन लोकांचा गैरसमज होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे तात्काळ सातारा पोलीसांनी प्रतिसाद देत या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणली. सोबतच आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.
अफवा पसरवून तेढ
या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.कारण यातूनच सामाजिक तेढ निर्माण होते. तसेच सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारीत करु नयेत. जेणेकरुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क व दक्ष राहून काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा,” असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.
.jpeg)
Post a Comment