जर तुमचा पाल्य CBSE बोर्डमध्ये शिक्षण घेत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
द इंक न्यूज
यवतमाळ : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने आपल्या अभ्यासक्रमात मोठा बदल केला आहे. आगामी परीक्षेत याची तुम्हास प्रचिती येणार आहे.
असे राहील स्वरूप
२०२४ ला होणाऱ्या दहावी व बारावीच्या प्रश्नपत्रिकांचे स्वरूप बदलले आहे. सर्वात मोठा बदल म्हणजे आता ५० टक्के प्रश्न बुद्धीकेंद्रित सक्षमतेवर राहणार आहेत. अधिक विश्लेषणात्मक व संकल्पना आधारित प्रश्न विचारल्या जाणार आहेत.
४५ टक्के प्रश्नांचे(MCQ ) एमसीक्यूमध्ये रुपांतर
जवळपास ४५ टक्के प्रश्नांचे एमसीक्यूमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. प्रश्नांची विविधता एमसीक्यू, लहान उत्तरे व संक्षिप्त उत्तरे अश्या स्वरूपात प्रश्नपत्रिका येणार असून त्यांना प्रत्येकी एक ते दोन गुण राहणार आहे. मंडळाने हा बदल स्पष्ट करण्यासाठी नवीन नमुना प्रश्नपत्रिकांचे संच प्रसिद्ध केले आहे. येणाऱ्या परीक्षेत कोणत्या प्रकारचे प्रश्न राहतील तसेच मार्किंग सिस्टीम कशी असेल, याचा बोध या नमुन्यातून घेणे शक्य होईल. मंडळाच्या वेबसाईटवर क्वेश्चन बँक नावाच्या विभागात ही माहिती उपलब्ध आहे.

Post a Comment