द इंक न्यूज
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत विविध शिक्षणक्रमाच्या हिवाळी सत्रनिहाय परीक्षा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार आहेत. परीक्षांना प्रविष्ठ होण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने सूचना जारी केली आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्याची मुदत २५ सप्टेंबरपर्यंत आहे. (Deadline till 25th september for examination application of ycmou nashik news)
सत्तरहून अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा
पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी अशा विविध स्तरावरील सुमारे सत्तरहून अधिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार आहेत. मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमाच्या हिवाळी सत्रनिहाय परीक्षा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून होणार आहे. परीक्षांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात उपलब्ध होईल.सोळा अंकी कायम नोंदणी क्रमांक असलेल्या सर्व पुनर्परीक्षार्थींनी ऑनलाइन अर्ज भरायचे आहे. कृषी अभ्यासक्रमांसाठी नोंदणी कालावधी प्रवेश घेतल्यापासून तीन वर्षांसाठी वैध राहील.
या तारखेपर्यंत भरता येणार अर्ज
कृषी शिक्षणक्रमासाठी पुनर्नोंदणी करता येणार नाही. कालावधी संपल्यानंतर नव्याने प्रवेश घ्यावा लागेल. विनाविलंब शुल्क परीक्षा अर्ज करण्याची मुदत २५ सप्टेंबरपर्यंत आहे.२६ ते ३० सप्टेंबर कालावधीत शंभर रुपये विलंब शुल्कासह अर्ज करता येईल. पाचशे रुपये विशेष विलंब शुल्कासह १ ते ६ ऑक्टोबरदरम्यान अर्ज करता येणार आहे. जितके विषय अनुत्तीर्ण आहेत, तितक्या विषयांकरिता परीक्षा शुल्क आहे. परीक्षा अर्ज आणि शुल्क प्रत्येक अनुत्तीर्ण सत्र, वर्षासाठी भरावे लागेल.

Post a Comment