Nature

जर तुम्ही पिझ्झा,बर्गर, तळलेले पदार्थ खात असाल तर...

भारतातील कोरोनरी ह्रदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ४.६ टक्के मृत्यू हे ट्रान्स फॅटी ॲसिडशी (trans fatty acid) संबंधित असण्याची शक्यता आहे. 


द इंक न्यूज

आजकाल जंक फूड (junk food) आवडीने खाल्ले जाते पण खरच हे पदार्थ आरोग्याला पौष्टिक (healthy) आहेत का? जागतिक आरोग्य संघटनेने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला त्यात हृद्यविकार (heart decise) होण्यामागची कारणे सांगितली आहे.


मुंबई : आज जे पदार्थ आपण आवडीने खात आहात तीच तुमचे हृदयाचे स्वास्थ बिघडवणारे आहे.तुमच्यापैकी अनेक जण पिझ्झा, बर्गर, कॉफ क्रीमर, तळलेले पकोडे, मफिन, पॉपकॉर्न, बिस्किटे, फिंगर चिप्स असे पदार्थ आवडीने खात असतील; पण तुम्ही खात असलेल्या या पदार्थ्यांमध्ये ट्रान्स फॅट्सचे प्रमाण सर्वाधिक आहे. तरीही आज अनेकांच्या आहारात या पदार्थांचा वापर आवडीने होताना दिसतो. 




विद्यार्थ्यांना याचेच फॅड 

विशेषत: शाळा, कॉलेजात जाणारे तरुण-तरुणी या पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करताना दिसतात. त्यांना याचेच फॅड लागले आहे.पण या पदार्थांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचा दावा आता जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे.


काय म्हणते WHO 

WHO ला असे आढळून आले की, जंक Lफूडमध्ये ट्रान्स-फॅट्सचे प्रमाण अधिक असते. या सेवनामुळे हृदयरोग, स्ट्रोक, टाईप २ मधुमेह आणि जळजळ होण्याचा धोका वाढतो; ज्यामुळे कर्करोग , संधिवात किंवा इतर चयापचयाशी संबंधित विकार होऊ शकतात. भारतातील कोरोनरी ह्रदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंपैकी ४.६ टक्के मृत्यू हे ट्रान्स फॅटी ॲसिडशी संबंधित असण्याची शक्यता आहे. ट्रान्स-फॅटचे सेवन एकूण ऊर्जेच्या सेवनाच्या एक टक्‍क्‍यापेक्षा कमी प्रमाणात असले पाहिजे. म्हणजे दिवसाला २,००० कॅलरी आहारासह २.२ ग्रॅमपेक्षा कमी ट्रान्स-फॅटचे सेवन केले पाहिजे. 


ट्रान्स-फॅट्स म्हणजे ? (Trance-Fats) 

चंदिगडमधील ‘पीजीआयएमईआर स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ’च्या आरोग्य व्यवस्थापनाचे प्राध्यापक डॉ. सोनू गोयल यांच्या मते, ट्रान्स-फॅट्स हे असंतृप्त चरबीचे एक प्रकार आहेत आणि ते नैसर्गिक आणि कृत्रिम दोन्ही स्वरूपात उपलब्ध आहेत. नैसर्गिक ट्रान्स-फॅट्सचे स्रोत दूध, लोणी, चीज व मांस उत्पादने आहेत; तर कृत्रिम ट्रान्स-फॅट्सचे (trance-Fats) स्रोत वनस्पती, मार्जरीन आणि पॅकेज केलेले स्नॅक्स आहेत. कृत्रिम ट्रान्स-फॅट्स; (trance-Fats) ज्यांना औद्योगिकरित्या उत्पादित केले जाते. कृत्रिम ट्रान्स-फॅट्सना अंशतः हायड्रोजनेटेड फॅट्स म्हणूनही ओळखले जाते, जे पदार्थांचे शेल्फ लाइफ वाढवण्यासाठी वापरले जातात.


यामध्ये सर्वाधिक प्रमाण

हायड्रोजनयुक्त वनस्पती तेलामध्ये ट्रान्स-फॅटचे प्रमाण सर्वाधिक असते. केक, कुकीज, पाई, शॉर्टनिंग, मायक्रोवेव्ह पॉपकॉर्न, रेफ्रिजरेटेड पीठ, बिस्किटे, डोनट्स, नॉन-डेअरी कॉफी क्रीमर, स्टिक मार्जरीन आणि अगदी तळलेले पदार्थ हे हायड्रोजनयुक्त वनस्पती तेलावर आधारित पदार्थ आहेत.


असा होतो आरोग्यावर परिणाम

ट्रान्स-फॅट्स (trance-Fats) रक्तातील लो-डेन्सिटी लिपोप्रोटीन (LDL) खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतात; जे संतृप्त चरबीच्या तुलनेत दुप्पट धोकादायक असते. पण हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात. हाय एलडीएलमुळे रक्तदाब वाढतो आणि कोरोनरी हृदयरोगाचा धोकाही वाढतो. ट्रान्स-फॅटमुळे (trance-Fats) जळजळ आणि एंडोथेलियल डिसफंक्शन (रक्तवाहिन्यांचे अस्तर कमकुवत होणे) या आजारांचा धोका वाढतो. त्याशिवाय गर्भधारणेदरम्यान इन्सुलिन प्रतिरोध आणि गुंतागुंत होऊ शकते, गर्भाच्या विकासाशी तडजोड होऊ शकते, अगदी वंध्यत्वदेखील येऊ शकते. औद्योगिकरीत्या उत्पादित ट्रान्स-फॅट्सचे कोणतेही आरोग्यदायी फायदे नाहीत.

Post a Comment

Previous Post Next Post