Nature

राखी बांधण्यापूर्वीच तुटली जीवनाची तार…

मंदिराच्या कळसावर झेंडा लावायला चढलेल्या तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

द इंक न्यूज

वर्धा : आज सर्वत्र रक्षाबंधनाची धामधूम सुरू असताना वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी मेघे गावात तिघांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. हे तिघेही गावातील मंदिराच्या कळसावर झेंडा लावायला चढले असताना विजेच्या धक्क्याने खाली कोसळून त्यांचा मृत्यू झाला. अशोक सावरकर, बाळू शेर, सुरेश झिले अशी मृतांची नावे आहेत.

पिपरी मेघे गावातील तुळजा भवानी मंदिरात हे तिघे नेहमीप्रमाणे सकाळी दर्शनासाठी गेले होते. यावेळी मंदिराच्या कळसावर झेंडा लावायला ते २५ फूट उंचीच्या खांबावर चढले. मात्र, त्यांचा तोल गेला आणि तिघेही लागूनच असलेल्या ३३ केव्हीच्या जीवंत विद्युत तारांचा त्यांना स्पर्श झाला. विजेचा जबर धक्का बसल्याने ते मंदिराच्या शेडवर कोसळले. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज रक्षाबंधन असल्यामुळे तिघांनीही मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात केली. झेंडा बांधण्यासाठी उत्साहात वर चढले असताना विजेच्या धक्क्याने तिघांच्याही जीवनाची तार कापल्या गेल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post