Nature

श्रावणात उपवास करताय तर या गोष्टीमुळे तो महाग पडू शकता...

द इंक डेस्क

सण, उत्सवांचा काळ सुरू झाला की, बाजारात अनेक गोष्टींची मागणी वाढते. त्यामुळे आपसुकच त्याचे दरही वाढतात. सध्या श्रावण मास सुरू असून अनेक घरांत उपवास करण्याची प्रथा आहे. उपवास म्हटले की, सहाजिकच सर्वांचे आवडते फळ म्हणजे केळी! केळी आणि उपवास हे समीकरण पक्के आहे. मात्र तुम्ही सध्या उपवास करत असाल तर तो तुम्हाला महाग पडू शकतो. 



उपवासात आणि इतरही वेळी केळी खाणे आरोग्यासाठी पौष्टिक असले तरी सध्या श्रावण महिन्यातील उत्सवी वातावरण बघता बाजारात केळींचे दर चांगलेच वधारले आहेत. भारतीच्या धार्मिक संस्कृतिक श्रावण मास म्हणजे अनेक व्रत, वैकल्यांचा महिना. श्रावणी सोमवारसोबतच नारळी पौर्णिमा, मंगळागौर असे अनेक कौटुंबिक सण, उत्सव याच महिन्यात असतात. श्रावण सोमवारचा उपवास अनेक कुटुंबात लहान, मोठे सर्वचजण करतात. अशावेळी पौष्टिक फळ म्हणून अर्थातच केळी हेच आवडते फळ सर्वजण खातात. उपवासात फलाहारात केळीस सर्वश्रेष्ट स्थान आहे. मात्र केळीचे दर वधारल्याने भक्तांना उपवसा महागात पडत आहेत. 

बाजारात ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच केळीचे दर वाढले आहेत. पूर्वी ४० रूपये डझन असलेली केळी आता ५० ते ६० रूपये डझनने विकली जात आहे. चांगल्या प्रतीच्या केळीचा भाव ६० रुपये, मध्यम प्रतीचा ५० रुपये तर साधारण प्रतीची केळी ४० रूपये डझन या दराने मिळत आहे. राज्यात उत्त्र महाराष्ट्रातील केळीसह दक्षिण भारतातूनही केळी विक्रीसाठी येते. दक्षिण भारतातील केळीची प्रत आणि दरही अधिक आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post