Nature

आमदार बच्चू कडू म्हणून सचिन तेंडुलकरच्या घरापुढे

सचिन तेंडुलकरला जुगार खेळायचा असेल तर भारतरत्न परत करावा 

द इंक

मुंबई : भारतरत्न सचिन तेंडुलकर हे ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करत असल्याने युवा पिढी अशा जुगार खेळांकडे आकर्षित होत आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे युवा वर्ग प्रभावित हाेऊ शकताे. त्यामुळे युवकांचे नुकसान रोखण्यासाठी आज गुरुवारी सचिनच्या घरापुढे त्यांनी आंदोलन केले. तेंडूलकर यांनी ऑनलाईन गेमबाबतची जाहिरात करु नये अशी मागणी कडूंची आहे. 




नितेश राणें यांचा मैत्रीचा सल्ला

या आंदाेलनावरुन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी बच्चू कडू यांना मैत्रीचा सल्ला दिला आहे.ते म्हणाले सचिन तेंडूलकर हा महान खेळाडू आहे. सचिनने देशाचा नावलाैकिक वाढविला आहे. या महान खेळाडूंच्या विराेधात काही म्हणणे  असेल तर बच्चू कडू यांनी तेंडूलकर याच्यासमवेत बाेलावे. परंतु त्याच्या विराेधात आंदाेलन करू नये,याचे त्यांनी भान राखाने असा सल्ला राणेंनी दिला.


सचिनकडून अपेक्षा नाही

सचिन तेंडुलकर यांच्याकडून अशी अपेक्षा नाही. त्यांनी केलेल्या गेमिंगच्या जाहिरातीमुळे युवकांना आमिष दाखविले जात असून ही युवापिढी यात ओढल्या जाईल,भारतरत्न असलेल्या सचिनकडून ही अपेक्षा नसल्याचे कडू यावेळी म्हणाले. 


Post a Comment

Previous Post Next Post