नागपूर रेल्वे स्थानकावरील थरार
द इंक न्यूज
नागपूर : येथील मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर एक बालिका नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसमधून पडली. मात्र फलाटावरील सुरक्षा दलाच्या जवानाने वेळीच धाव घेत मुलीस रेल्वे आणि फलाटाच्या फटीतून अलगद बाहेर ओढल्याने तिचा जीव बचावला. निधी गिरी (१४) असे या बचावलेल्या बालिकेचे नाव आहे. ही घटना स्थानकातील फलाट क्रमांक आठवर सोमवारी रात्री घडली.
निधी आपली आई पल्लवी गिरी यांच्यासोबत आपली काकू सोनाली गिरी यांना सोडण्यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर आल्या होत्या. त्या नागपूर- मुंबई दुरान्तो एक्सप्रेसने मुंबईला जात होत्या. सोनाली गिरी यांचे साहित्य आसनापर्यंत पोहचवण्यासाठी या दोघी डब्यात चढल्या. दरम्यान गाडी सुरू झाली. गाडी निघाल्याचे लक्षात येताच निधीने धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा पाय घसरला आणि तोल जावून ती गाडी आणि फलाटच्या फटीत पडली. सुदैवाने तेथे तैनात आरपीएफ जवान जवाहर सिंह यांचे तिच्याकडे लक्ष गेले. त्यांनी धाव घेऊन निधीला फटीतून बाहेर ओढले. त्यामुळे निधीचे प्राण वाचलेया घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. रेल्वे सुरक्षा दलाने निधीच्या कुटुंबियांना धावत्या गाडीतून न उतरण्याबाबत समज देवून सोडून दिले. या घटनेने रेल्वे स्थानकावर काही काळ खळबळ उडाली होती.

Post a Comment